How to Talk to Anyone: 92 Little Tricks for Big Success in Relationships Marathi Bestseller Book Communication Skills by Leil Lowndes Books मराठी पुस्तक

0
7


From the Publisher

How to Talk to Anyone: 92 Little Tricks for Big Success in Relationships

How to Talk to Anyone
How to Talk to Anyone

पुन्हा कधीही शब्दांची कमतरता भासू देऊ नका!

तुम्हाला कधी अशा यशस्वी लोकांचे कौतुक वाटले आहे का, ज्यांचे आयुष्य अगदी सुफळ-संपन्न आहे असे वाटते? तुम्ही अशा लोकांना पार्ट्यांमध्ये व बिझनेस मीटिंग्जमध्ये आत्मविश्वासाने बोलताना पाहता. अशा लोकांकडे सर्वोत्तम नोकर्‍या, उत्तम जोडीदार व चांगले मित्र असतात.

हे लोक काही तुमच्यापेक्षा जास्त हुशार किंवा दिसायला अधिक देखणे असतात असे नाही. मग त्यांच्या यशाचे रहस्य काय असते? त्यांच्याकडे लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य असते.

‘हाउ टू टॉक टू एनीवन’ या बेस्टसेलिंग पुस्तकात जागतिक स्तरावरील अव्वल लेखिका आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लाइफ कोच लायल लाउंड्स यांनी यशस्वी संवादाची रहस्ये आणि मानसशास्त्र उलगडले आहे. या साध्यासोप्या व प्रभावी अशा 92 तंत्रांद्वारे तुम्ही पुढील कौशल्ये आत्मसात करू शकता:

एखाद्या राजकीय व्यक्तीप्रमाणे पार्टीवर पकड कशी मिळवावी?

कोणत्याही समूहात आतल्या गोटातील व्यक्ती कसे व्हावे?

संवादाला सुयोग्य दिशा देण्यासाठी शब्दांचा आणि वाक्प्रचारांचा वापर कसा करावा?

समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी देहबोलीचा वापर कसा करावा?

या पुस्तकाचा सुबोध व ओघवता मराठी अनुवाद केला आहे सुप्रिया वकील यांनी. कोणत्याही प्रसंगी यशस्वी संवाद कसा साधावा याबाबत मार्गदर्शन करणारे पुस्तक.

How to Talk to Anyone
How to Talk to Anyone

तुम्हाला कधी अशा यशस्वी लोकांचे कौतुक वाटले आहे का, ज्यांचे आयुष्य वरवर पाहता अगदी सुफळ संपन्न आहे. तुम्ही या लोकांना बिझनेस मीटिंग्जमध्ये आत्मविश्वासाने बोलताना पाहता, पार्ट्यांमध्ये सहजपणे वावरताना पाहता. त्यांच्याकडे सर्वोत्तम नोकर्‍या असतात, उत्तम जोडीदार असतात, चांगले मित्र असतात, गब्बर बँक खाती असतात आणि अत्यंत फॅशनेबल पिनकोड्सही असतात.

पण जरा थांबा! अशा लोकांपैकी बहुतेकजण काही तुमच्यापेक्षा जास्त हुशार नसतात. ते तुमच्यापेक्षा जास्त शिकलेलेही नसतात आणि तुमच्यापेक्षा जास्त देखणेही नसतात!

त्यांच्या या यशाला कारणीभूत असते ती इतरांशी वागण्याची पद्धत… अधिक कुशल पद्धत.

लक्षात घ्या, कुणीही एकट्याने शिखरावर पोहोचत नाही. ज्या लोकांचे आयुष्य ‘सुफळ संपन्न’ दिसते त्यांनी आजवर त्या हजारो जणांच्या हृदयात स्थान मिळवले आहे व त्यांची मने जिंकली आहेत, ज्यांनी त्यांना टप्प्याटप्प्याने शिखरापर्यंत जाण्यास मदत केली आहे. मग ती शिडी कॉर्पोरेट असो वा सामाजिक क्षेत्रातील.

अर्थात आज जे जुने लोक (तितकेही जुने नव्हे) – आपला देश, आपल्या संस्था, मंडळे आणि आपल्या कला यांसाठी योगदान देतात, तो नक्कीच ‘अपघात’ किंवा ‘योगायोग’ नसतो. या सगळ्या लोकांकडे आहेत युक्त्याप्रयुक्त्या, जादूची पोतडी आणि असा परीसस्पर्श ज्यामुळे ते जे काही करतात ते यशस्वी होते.

त्यांच्या या पोतडीत काय असते?

त्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी सापडतील. त्यामध्ये मैत्रीचे धागे घट्ट विणणारी सामग्री असते. लोकांची मने जिंकून घेणारी विशिष्ट कौशल्ये असतात आणि एक अशी जादू असते, ज्यामुळे लोक त्यांच्या प्रेमात पडतात. त्यांच्याकडे असे गुणवैशिष्ट्य असते ज्यामुळे बॉस मंडळी त्यांना कामावर नेमतात आणि त्यानंतर त्यांना बढतीही देतात. त्यांच्याकडे असे गुणवैशिष्ट्य असते ज्यामुळे त्यांचे ग्राहक परतपरत त्यांच्याकडे येतात आणि त्यांच्याकडे अशी मौल्यवान गोष्ट असते ज्यामुळे ग्राहक त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडून नव्हे तर त्यांच्याकडूनच खरेदी करतात.

आपल्या सर्वांच्या पोतडीत यापैकी काही युक्त्या असतातच, काही युक्त्या इतरांपेक्षा जास्तच असतात. ज्यांच्याकडे त्याचा संपूर्ण संग्रह असतो ते लोक आयुष्यात खूप मोठे होतात… बिग विनर्स. ‘हाउ टू टॉक टू एनीवन’ या पुस्तकात तुम्हाला अशा ‘बिग विनर्स’नी उपयोगात आणलेल्या ब्याण्णव छोट्या छोट्या युक्त्या समजतील, ज्यायोगे तुम्हीही आयुष्याचा डाव परिपूर्णरीत्या खेळू शकाल आणि आयुष्यात तुम्हाला जे हवे ते मिळवू शकाल.

लक्षात ठेवा, एखादी कृती पुन:पुन्हा करण्याने सवय लागते

तुमच्या सवयीतून तुमचे व्यक्तित्व घडते आणि

तुमचे व्यक्तित्व हेच तुमचे नशीब असते.

How to Talk to Anyone
How to Talk to Anyone

दोन माणसांदरम्यान अब्जावधी क्रिया व प्रतिक्रिया वेगाने घडत असतात. त्यामध्ये आपण आपला संवाद सुस्पष्ट आत्मविश्वासपूर्ण, विश्वासार्ह व करिश्माई बनवण्यासाठी कुठली ठोस तंत्रे मिळवू शकतो का?

या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याच्या निश्चयाने मी संवादकौशल्ये, करिश्मा, लोकांमधील ‘केमिस्ट्री’ या विषयांवरील सगळी पुस्तके वाचली. नेतृत्वगुण विश्वासार्हता कोणत्या गुणवैशिष्ट्यांमुळे निर्माण होते हे जाणून घेण्यासाठी मी जगभरात आयोजित केलेले शेकडो संशोधनपर अभ्यास धुंडाळले. निर्भय समाजशास्त्रज्ञांनी याचे सूत्र शोधण्यासाठी कोणतीही कसूर बाकी ठेवलेली नाही.

या विषयीच्या बहुतेकशा संशोधनांनी डेल कार्नेगींच्या ‘हाउ टू विन फ्रेंड्स अ‍ॅण्ड इन्फलुअन्स पीपल’ या 1936 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘क्लासिक’ पुस्तकावर शिक्कामोर्तब केले आहे.

ते म्हणतात की, यश स्मितहास्यात, इतर लोकांमध्ये रस दाखवण्यात व त्यांना त्यांच्याबद्दल सुखद भावना देण्यात दडलेले असते. माझ्या मनात आले ‘‘यात आश्चर्य नाही.’’ साठ वर्षांपूर्वी हे जितके खरे होते तितकेच ते आजही आहे.

आजच्या अत्याधुनिक जगात, केवळ ‘स्मित’ देणे अथवा ‘मनापासून प्रशंसा करणे’ पुरेसे ठरत नाही. आज बिझनेसमधील दोषैकदृष्टीची माणसे तुमच्या स्मितहास्यात आणखी खाचाखोचा शोधतात, तुमच्या प्रशंसेत आणखी गुंते शोधतात. यशस्वी अथवा आकर्षक लोकांच्या भोवती ढोंगी व ममत्व दाखवणार्‍या खुशमस्कर्‍यांचा गराडा असतो.

इ.स. 1936 पेक्षा आता हे जग खूपच वेगळे आहे, त्यामुळे आपल्याला यशाचे नवे सूत्र गवसणे आवश्यक आहे. ते शोधण्यासाठी मी आताच्या ‘सुपरस्टार’ मंडळींचे निरीक्षण केले. विक्री विभागातील उच्चपदस्थ लोक व्यवहार पटवण्यासाठी, वत्ते लोकांना त्यांचे म्हणणे पटवून देण्यासाठी, कलाकार लोकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी, मादक व्यक्तींना कामुकपणे भुरळ घालण्यासाठी आणि क्रीडापटूंना जिंकण्यासाठी जी तंत्रे वापरतात ती मी शोधली.

मी त्यांच्या यशाला कारणीभूत ठरणारे ठोस पायाभूत घटक शोधले.

आणि मग मी ते सहज समजतील अशा पद्धतीने सुटसुटीतपणे मांडले. मी त्या सर्वांना नावेही दिली आहेत, ज्यायोगे तुम्हाला कधी संवाद साधण्यात अडचण आली तर तुम्हाला ती चटकन आठवतील. ही तंत्रे विकसित केल्यानंतर मी ती अमेरिकाभर श्रोत्यांना सांगू लागलो. माझ्या ‘कम्युनिकेशन्स सेमिनार’मध्ये सहभागी होणारे लोक मला त्यांच्या कल्पना सांगू लागले. माझ्या क्लायन्ट्सनी – त्यापैकी बरेचजण

फॉर्च्युन 500 कंपन्यांचे (‘फॉर्च्युन मासिकात प्रसिद्ध होणार्‍या यादीतील500 अग्रगण्य कंपन्या) मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत- मला उत्साहाने त्यांची निरीक्षणे सांगितली.

मी सर्वांत यशस्वी व अत्यंत लोकप्रिय नेत्यांच्या सहवासात असताना, त्यांची देहबोली, त्यांच्या चेहर्‍यावरील भाव बारकाईने अभ्यासले. त्यांचे सहज संभाषण, त्यांचे ‘टायमिंग’, त्यांची शब्दांची निवड बारकाईने ऐकली. ते त्यांच्या कुटुंबाशी, मित्रपरिवाराशी, सहकार्‍यांशी व त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी कसे वागतात हे पाहिले. यामध्ये मला प्रत्येक वेळी त्यांच्या संवादात छोटीशी जादुई झलक दिसली की, मी त्यांना ती चिमटीत पकडून जाणिवेच्या झगझगीत प्रकाशात आणायला सांगायचो. मग आम्ही त्याचे एकत्र मिळून विश्लेषण करायचो आणि त्यानंतर मग ते तंत्र म्हणून विकसित करायचो, जे इतर लोक उपयोगात आणून त्याचे लाभ मिळवू शकतील.

या पुस्तकामध्ये माझे निष्कर्ष आहेत व अत्यंत प्रभावी लोकांनी अनुसरलेल्या अशा काही गोष्टी आहेत. यातील काही गोष्टी सूक्ष्म आहेत. काही आश्चर्यकारक आहेत; पण या सगळ्या गोष्टी साध्य करता येण्याजोग्या आहेत. तुम्ही त्यात नैपुण्य मिळवलेत की अगदी नव्याने ओळख झालेल्या माणसांपासून ते तुमचे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी व व्यावसायिक सहकारी… सगळेजण आनंदाने त्यांच्या मनाची, घरांची, कंपन्यांची दारे तुमच्यासाठी खुली करतील, एवढेच नव्हे तर त्यांना जे शक्य असेल ते तुम्हाला देण्यासाठी त्यांचा खिसासुद्धा खुला करतील.

तुम्हाला एक बोनसही मिळेल. तुम्ही तुमच्या नव्या संवाद कौशल्यासह आयुष्यात वाटचाल करताना मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला काही अत्यंत समाधानी, सस्मित चेहरे दिसतील.

Leil Lowndes
Leil Lowndes

लायल लाउंड्स

लायल लाउंड्स या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संवादतज्ज्ञ आहेत. त्या ‘फॉर्च्युन 500’ कंपन्यांतील उच्चपदस्थ अधिकार्‍यांना तसेच फ्रंटलाइन कर्मचार्‍यांना अधिक समर्थपणे संवाद साधण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यांनी अमेरिकेतील सर्व प्रमुख शहरांमध्ये व्याख्याने दिली असून, यूएस पीस कॉर्प्स, परदेशी सरकारे व प्रमुख संस्थांसाठी संवादविषयक सेमिनार्स घेतले आहेत. त्या टीव्ही व रेडिओवरील अनेक कार्यक्रमांत दिसल्या आहेत; तसेच ‘द न्यूयॉर्क टाइम्स,’ ‘शिकागो ट्रिब्यून’ व ‘टाइम’ मासिकाने त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. ‘रेडबुक’ ‘न्यू वुमन,’ ‘सायकॉलॉजी टुडे’, ‘पेंटहाऊस’ व ‘कॉस्मोपोलिटन’ अशा लोकप्रिय नियतकालिकांत त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. लेखिका न्यूयॉर्कमध्ये राहतात.

‘‘हाउ टू टॉक टू एनीवन’ आणि ‘हाउ टू मेक एनीवन फॉल इ लव विथ यू’ या बेस्ट सेलिंग पुस्तकांसह त्यांची चार पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

जर तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात अशा विजेत्यांच्या कोणत्याही युक्त्या दिसून आल्या असतील तर तुम्ही त्या लेखिकेशी शेअर करू शकता.

Website : http : //www.lowndes.com

Publisher ‏ : ‎ SAKET PRAKASHAN PVT LTD (1 January 2022)
Language ‏ : ‎ Marathi
Perfect Paperback ‏ : ‎ 376 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203534
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203536
Reading age ‏ : ‎ 18 years and up
Item Weight ‏ : ‎ 300 g
Country of Origin ‏ : ‎ India

ASIN : 9352203534
Brand :

Buy Now Price: ₹340.00
(as of Jun 28,2022 05:33:53 UTC – Details)
#Talk #Tricks #Big #Success #Relationships #Marathi #Bestseller #Book #Communication #Skills #Leil #Lowndes #Books #मरठ #पसतक