Chan Chan Goshti Guru-Shishyanchya, Story Books for Kids, Chhan Chhan Children Book in Marathi, बाल कथा, छान छान गोष्टी पुस्तके, मराठी पुस्तक Isapaniti इसापनीती

0
16


From the Publisher

Goshti Guru-Shishyanchya

Goshti Guru-Shishyanchya
Goshti Guru-Shishyanchya

प्राचीन काळापासून भारताने गुरू-शिष्यांची संपन्न परंपरा जपली आहे. आपल्या देशाच्या इतिहासात असे अनेक महान गुरू-शिष्य होऊन गेले, ज्यांनी आपल्या आदर्श आचरणाद्वारे संपूर्ण जगापुढे गुरू-शिष्य नात्याचे सर्वोत्तम उदाहरण ठेवले. आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे स्थान अतिशय महत्त्वाचे असते. गुरू आपल्याला बहुमूल्य असे ज्ञान देतात, पदोपदी मार्गदर्शन करतात. त्यांच्यामुळे आपल्या जीवनाला दिशा मिळते. गुरूंकडून ज्ञानप्राप्ती करून आपले आयुष्य घडवणे आणि या ज्ञानाचा समाजासाठी योग्य तो वापर करणे ही शिष्याची जबाबदारी असते. हे कर्तव्य यथोचित निभावणारी व्यक्तीच शिष्योत्तम ठरते. प्रस्तुत पुस्तकात यांपैकी विविध ४५ गुरू-शिष्यांच्या प्रसिद्ध कथा सांगण्यात आल्या असून संस्कारक्षम वयातील मुलामुलींसाठी त्या नक्कीच प्रेरक ठरतील.

Goshti Guru-Shishyanchya
Goshti Guru-Shishyanchya

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:।

गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम:॥

सद्गुरू हे शिष्याची आत्मज्योत जागृत करतात. त्याचबरोबर शिष्यामधील सुप्तशक्ती जागृत करून इतरांचीही आत्मज्योत जागृत करण्याचे सामर्थ्य शिष्याला प्रदान करतात. याप्रमाणे एका ज्योतीने अनेक ज्योतींचा दिव्य प्रकाश पडतो व कैवल्याचा मार्ग सुकर होतो. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘‘सद्गुरू काय नोहे’’ तर समर्थ म्हणतात, ‘‘आता सद्गुरू वर्णवेना.’’ त्या सद्गुरू परब्रह्माचे वर्णन करणे शक्य नसल्यामुळे चारही वेद त्यांना ‘नेति नेति’ म्हणतात. श्रीमंत मातापिता, चांगल्या कुळात जन्म, भौतिक समृद्धी हे सर्व प्राप्त होऊ शकेल; पण सद्गुरू मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने, बोधामृताने साधकाची उपासना मार्गावर वाटचाल सुरू होते व सद्गुरू भेटल्यानंतर त्याला दुसर्‍या कशाचीही आवश्यकता भासत नाही.

यात्रा, नवससायास, होमहवनादी क्रिया, उपवास इ. करून देहदंड सोसण्यापेक्षा सद्गुरूची नि:स्वार्थ भक्ती, सेवा केल्यास आत्मस्वरूपाचे ज्ञान कसे प्राप्त होते व जन्ममरणाच्या फेर्‍यातून सुटका करून घ्यावयाची असल्यास सद्गुरूची कृपा कशी प्राप्त करावी याविषयी सविस्तर माहिती देणारे हे प्रेरणादायी पुस्तक.

आपल्याकडे सद्गुरू-शिष्य परंपरा प्राचीन काळापासून आस्तत्वात आहे. अनेक गुरू-शिष्यांच्या जोड्या तर इतक्या प्रसिद्ध आहेत की, त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला तर साधकाचे आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय सफल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर शिष्याला गुरूंची महानता, गुरुसेवेचे महत्त्व, गुरुसेवा कशी करावी याबद्दलचे मार्गदर्शन इ. सर्व गोष्टींचेही आकलन होऊ शकेल.

हे सर्वकाही गुरू व शिष्य यांच्या विविध कथांमधून विशद करण्याचा प्रमुख हेतू या पुस्तकामागे आहे.

Goshti Guru-Shishyanchya
Goshti Guru-Shishyanchya

एक दिवस संत कन्फयुशिअसच्या जवळ जाऊन त्यांचे शिष्य म्हणाले, ‘‘गुरुदेव खरा ज्ञानी कोण असतो?’’ कन्फ्युशिअस म्हणाले, ‘‘तुम्ही सर्वजण खाली बसा. मी सांगतो.’’ एवढं सांगून त्यांनी आपली राहिलेली दिनचर्या पूर्ण केली व ते वस्त्र परिधान करून बाहेर आले.

नंतर सर्व शिष्यांना घेऊन ते एका ठिकाणी जाऊ लागले. सर्वांनी एका गुहेत प्रवेश केला. तेथे एक महात्मा राहत होते. ते जप, तप, चिंतन यामध्ये आपला वेळ घालवीत असत. कन्फ्युशिअसने त्यांना वंदन करून विचारले, ‘‘हे भगवान, आम्ही येथे सर्वजण भगवंताचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आलो आहोत. तो कोण आहे? कसा आहे? कोठे राहतो?’’ ते एकदम रागावून म्हणाले, ‘‘तुम्ही सर्वजण माझी शांतता भंग करण्यासाठी येथे का आला आहात?’’ कन्फ्युशिअस आपल्या सर्व शिष्यांना घेऊन बाहेर आले. ते म्हणाले, ‘‘हे एक ज्ञानी आहेत. त्यांनी संसाराकडे पाठ फिरवली आहे. संसारातील सुखदु:खाने त्रस्त होऊन एकांतात शांततेचा अनुभव घेण्याची त्यांची इच्छा आहे. हे निम्न दर्जाचे संत आहेत.’’

त्यानंतर ते सर्वजण एका गावामध्ये पोहोचले. तेथे एक तेली तेलाचा घाणा चालवत होता. बैलांचे डोळे बांधले होते. तो आपल्याच धुंदीत कधीपासून हे काम करीत होता कोणास ठाऊक? तो तेली घाणावर बसून आपल्याच धुंदीत कोणते तरी गाणे गुणगुणत होता.

कन्फ्युशिअस त्याला म्हणाले, ‘‘हे बंधो, तू ब्रह्मज्ञानी आहेस असे आम्ही ऐकले आहे. आता तू आम्हाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करावा.’’ तेली हसून म्हणाला, ‘‘हा बैलच माझा परब्रह्म, माझा परमात्माच आहे. याचीच मी सेवा करतो. आम्ही दोघे सुखी आहोत एवढेच.’’

गुरुदेव बाहेर आले आणि शिष्यांना म्हणाले, ‘‘जो परिस्थितीचे अवलोकन करतो तो मध्यम प्रतीचा ज्ञानी असतो. हा तेली गृहस्थाच्या रूपात प्रबुद्ध आहे. त्याच्या मनात ज्ञानप्राप्तीची लालसा आहे. तो हळूहळू आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल.’’ नंतर पुढे गेल्यानंतर ते म्हणाले, ‘‘पुस्तके वाचून, माहात्म्याची प्रवचने ऐकून जेवढे ज्ञान होते तेवढेच ज्ञान परिस्थितीचे अवलोकन केल्यामुळे होते. पुस्तक हे तर वैयक्तिक स्वरूपाचे असते. प्रवचन म्हणजे एका व्यक्तीच्या ज्ञानसाधनेचे ते फलित असते. या विनाशी जगताकडे बघा व सत्य-असत्य यामध्ये असणारा भेद समजावून घ्या. जे स्पष्ट आहे, निर्विकारी आहे आणि सत्य देखील आहे तेच तुमच्या बुद्धीला पटेल. नंतर आपल्या जीवनात त्याचा पाठपुरावा केला तर कल्याण होण्याची शक्यता असते.’’ अशाप्रकारे बोलत बोलत ते सर्वजण एका वृद्ध स्त्रीच्या दारात येऊन थांबले. कितीतरी मुले तिच्या आसपास गोंगाट करीत होती. ती वृद्ध स्त्री चरख्यावर सूत कातत होती. मध्येच मुलांनी पाणी मागितले असता ती त्यांना पाणी देत होती. कधी कधी खोडसाळ मुलांना दम देत होती. कोणाला तरी हसत हसत समजावीत होती. नंतर मुले खेळावयास गेली की, पुन्हा आपला चरखा चालवण्यास सुरुवात करीत होती.

कन्फ्युशिअस आणि त्याचे शिष्य तेथे पोहोचताच सर्व मुले पळून गेली. त्यांनी त्या वृद्ध स्त्रीला विचारले, ‘‘माताजी आपण ईश्वराला पाहिले आहे का? हे कृपा करून आम्हाला सांगा.’’ ती हसून म्हणाली, ‘‘बेटा, होय. तो आताच येथे खेळत होता. आपल्याला पाहिल्याबरोबर तो पळून गेला.’’ कन्फ्युशिअस शिष्यांना घेऊन स्वगृही परतले. ते म्हणाले, ‘‘निष्काम ज्ञानस्वरूपात ही वृद्ध स्त्रीच खरी ज्ञानी आहे. ती आपल्या ज्ञानाचा उपयोग कोणत्याही लाभासाठी करीत नाही. याउलट ती त्यापासून परावृत्त होऊन स्वत: आत्मानंदात मग्न होऊन मुक्तीचा अनुभव घेते आहे.’’

Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd (1 January 2022)
Paperback ‏ : ‎ 144 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352203577
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352203574
Reading age ‏ : ‎ 3 – 15 years
Item Weight ‏ : ‎ 120 g
Country of Origin ‏ : ‎ India

ASIN : 9352203577
Brand :

Buy Now Price: ₹170.00
(as of Aug 20,2022 02:42:13 UTC – Details)
#Chan #Chan #Goshti #GuruShishyanchya #Story #Books #Kids #Chhan #Chhan #Children #Book #Marathi #बल #कथ #छन #छन #गषट #पसतक #मरठ #पसतक #Isapaniti #इसपनत